गणेश पहिल्यांदा कोर्ससाठी म्हणून इंग्लंडला गेला तेव्हा त्याला पोहचवण्यासाठी मुंबईला विमानतळावर गेलो . आयुष्यात प्रथमच विमानतळ बघितले ती भव्य इमारत आणि वेगवेगळ्या विमान कंपनीच्या गेटवरची गर्दी . व प्रवाशांची लगबग , परदेशी प्रवाशी, पायलट व एयर होस्टेस यांची धावपळ बघितल्यावर टर्मिनलच्या आतमध्ये कसे असेल याची फक्त कल्पना करू शकत होतो . जेव्हा गणेश त्याची ब्याग घेऊन गेटवर गेला तेव्हा आम्हाला आत येऊ दिले नाही , सेक्युरिटीने आत जाता येणार नाही हे सांगितले . फार वाईट वाटले . आम्ही सर्वच त्याला निरोप देण्याकरिता तेथे होतो … डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते सौ अनुराधा तर अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होती . . आमच्या घरातील परदेशी जाणारा गणेश दुसरा होता. माझे वडील मराठा लाईट इनफंट्री मध्ये असतांना ते जपानला गेले होते त्यानंतर गणेश इंग्लंडला निघाला होता . आमच्यासाठी तो अविस्मरणीय क्षण होता . तो समोरच्या काचेमधून दिसत होता , इमिग्रेशनच्या टेबलजवळ होता तोपर्यंत दिसला नंतर पुढच्या क्षणी तो आणखी आत गेला मग फक्त फोनवर बोलणे झाले आणि तो विमानात बसला तेव्हा त्याचा एक फोन आला , मला फोनवर बोलताच येईना गळा भरून आला डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळतच होते . हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही .
गणेश वारंवार परदेशी जातच होता मग मात्र काहीच वाटत नव्हते कारण ल्यापटॉपवर व्हिडीओवर बोलणे नेहमीच व्हायचे .मलेशियाला असतांना तो मला नेहमी म्हणायचा कि " आण्णा मी इथे आहे तोपर्यंत तुम्ही येउन जा " मी हो म्हणालो, आणि पासपोर्टच्या तयारीला लागलो तेव्हा मी पाटबंधारे खात्यामधे सरकारी सेवत होतो व् पस्पोर्टचा टेबल माझ्याकडेच होता . मी लगेच तयारीला लागलो . पासपोर्टसाठी लागणारे कागदपत्रे , पासपोर्ट फोटो तेही विशिष्ठ साइजमधेच , शाळा सोडल्याचा दाखला, नोकरीत असल्याचा दाखला , ऐसे सर्व कागदपत्रे एजेंटकड़े दिल आणि त्याने ते ऑनलाइन भरले , व् नंतर महिनाभरात पोलिस चौकशी वगैरे सोपस्कार पर पडले आणि फ़क्त माझा एकट्याचाच पासपोर्ट आला माझ्या पत्नीचा नहीं आला त्यामुळे मलेशियाला जाता आले नाही . तो पासपोर्ट दोन महिन्यांनी आला . पण तोपर्यंत आमचा मूड पण राहिला नव्हता .
मालेशियानंतर गणेश ऑस्ट्रेलियाला गेला आणि तेथे चांगला स्थिरावला व त्याचे पुन्हा सुरु झाले , " आण्णा आता मात्रा आई आणि तुम्ही इकडे आलेच पाहिजे . " तो मेलबर्न येथे राहत होता . आमचे पुन्हा परदेश वरची तयारी सुरु झाली . पासपोर्ट तर होतेच आता व्हिसा महत्वाचा होता त्यासाठी पुन्हा कागद पत्रे गोळा करणे आलेच . त्यातच माझी एप्रिल २०१३ मध्ये बायपास झालेली आणि नातेवाईक म्हणायचे " कशाला धाडस करता ? लांबचा पल्ला आहे विमानात १३-१४ बसायचे , तुम्हाला जमेल का ? " पण तुम्हाला सांगू का मी बायपास झाल्यानंतर मी वृंदावनाला सात दिवस भागवत साप्ताह केला तेव्हा तो प्रवास मला काहीही त्रासदायक वाटला नाही त्यानंतर द्वारकेला सुद्धा सात दिवस साप्ताह केला काहीही त्रास झाला नाही . त्यामुळे मला धाडस आलेले होतेच शिवाय भगवंतावर पूर्ण विश्वास . ……क्रमश:
ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सादर करीत आहे . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा