

मुंबई विमान तळावर
आमचे सर्व कागपत्रांचे सोपस्कार संपले
व आमच्या हाती थोडा वेळ होता तेवढ्या वेळेमध्ये आम्ही
आमच्या मोबाईलसाठी एक
आंतरराष्ट्रीय
सिम विकत घ्यायचे ठरविले
आणि एका सीमच्या स्टालवर गेलो
व चौकशी केली
तेव्हा कळले कि
एका सिमला २५००/-
रुपये लागतात मी
थोडी कमी जास्त
करण्याची विनंती केली आणि
त्याने ५००/- रुपये
कमी केले व
ते सिम २०००/-
रुपयाला मला दिले पण
पावती दिली नाही
, त्याने मला सांगितले कि
तुमचा ई मेल
आय डी द्या
मी तुम्हाला मेल
करिन . ठीक आहे
म्हणालो पण तुम्हाला सांगतो
कि मला अद्यापर्यंत त्याचा
मेल आला नाही
मी ओळखून घेतले
कि आपण फसवले
गेलो आहोत. असो
पण ते सिम
कार्ड मात्र चालू
होते , हेही नसे
थोडके . " ये मेरा इंडिया "
वेगवेगळे वस्तूंचे स्टोल बघितले आणि
सहज किमती विचारल्या तर
त्या सर्व आवाक्याबाहेरचं वाटायला लागल्या आणि
त्याच वस्तू बाहेर
खूप स्वस्त होत्या.
असो सर्व विमान
तळ एअर कंडिशन
असल्यामुळे , त्याचीही वसुली आणि लोक परदेशी
जातात त्यामुळे वस्तूंच्या किमती
सुद्धा वाढत असाव्यात अशी
मनाची समजूत करून
घेतली . सौ. ला म्हणालो ," आपण आता
चहा आणि थोडा
फार नाश्ता करू ." आणि आम्ही
तेथील एका हॉटेलमध्ये गेलो
नेहमीप्रमाणे वेटरला चहा सांगितला , त्याने
आमच्याकडे बघितले व जवळ
येऊन म्हणाला येथे
एक चहा १५०/-
ला आहे आणू
का ? मी सौ
कडे बघितले काय
करायचे ? चहा घ्यायचा का
? ती नको म्हणाली , मी
म्हणालो "जाऊ दे घेऊ
आपण चहा घेऊ तेवढीच आठवण !" ..... आणि घेतला
चहा . पहिल्यांदा इतक्या महागाचा चहा
पिलो !! नाश्त्याला काय
आहे विचारले तर
तो म्हणाला पुरीभाजी आहे.
किती पैसे ? त्याला
विचारले तो म्हणाला " ३००/- रुपये
फक्त " असो सौ ला म्हणालो नाश्ता करूया हे
सुद्धा आपल्या स्मरणात राहील
. आम्ही चहा नाश्ता
केला आणि एन्जॉय
केला . नंतर जेट
एअरलाईनच्या काउंटर जवळ जाऊन
बसलो . व ९..
२० ला अनाऊन्सिंग झाले
आणि प्रवासी एका
लाईनींत उभे राहिले आम्ही
सुद्धा त्याच लाईनमध्ये उभे
राहिलो काउंटरवरील सुटाबुटातील अपटुडेट माणसाला आम्ही
आमचे तिकीट व
पासपोर्ट दाखवले आणि विमानाला जोडलेल्या एअर
कंडिशन जिन्यातून विमानाच्या दरवाज्यापर्यंत गेलो
तिथे तीन चार
हवाई सुंदरी अगदी
हसत मुखाने " वेलकम " म्हणत स्वागत
करीत होत्या . आपल
इतक रुबाबात कोणी
स्वागत करतंय हाच
एक सुखद अनुभव
होता . आम्हाला आमचे
आसन दाखवले अगदी
खिडकीशी चेअर बुक केलेल्या होत्या
३x ३ सीट
होत्या प्रथम मी खिडकीजवळचे सीटवर बसलोनंतर मात्र सौ ने खिडकीजवळच्या सीटचा
ताबा घेतला. बाहेरचे दृश्य बघण्याची उत्सुकता आम्हा दोघानाही होतीच . नंतर
मी मधल्या सीटवर बसलो आणि माझ्या शेजारी एक मध्यम वयीन ऑस्ट्रेलियन गृहस्थ बसले . विमानात बरेचसे परदेशी लोक होते व भारतीय लोक सुद्धा बऱ्यापैकी होते . योगेशला फोन लावला आणि सांगितले आम्ही आता विमानात बसलो आहोत तुम्ही निघालात तरी चालेल , नारायण, सौ पूजा यांच्याबरोबर बोललो पण बोलताना पुन्हा कंठ दाटून येताच होता. तिघांचा निरोप घेतला.
पायलटने घोषणा केली
कि आता अगदी
पाचच मिनिटात विमान
सुरु होईल सर्वांनी बेल्ट
बांधून घ्या , आपापले मोबाईल बंद करा किंवा फ्लाईट मोडवर ठेवा आणि
लगेच एका हवाई
सुंदरीने बोलायला सुरवात केली आणि
बेल्ट कसे बांधायचे , अडचणीच्या वेळी
आपल्या डोक्यावरच असलेला
प्राणवायूचा मास्क कसा
वापरायचा , संकट काळी कोणत्या दरवाज्याने बाहेर
जायचे ते हि
दाखवले दुसऱ्या एका
हवाई सुंदरीने प्रत्येकाला छानशा
मऊसूत शाली आणि
हेड फोन दिले
व त्यांच्या कंपनीची व
विमानाची माहिती असलेले एक
सुंदर पुस्तक दिले
व त्याचबरोबर चॉकलेट
दिले आणि घोषणा
केली कि आता
विमान उड्डाण करणार
आहे .
इंजिनाची घरघर
सुरु झाली आणि
विमान रनवेवर धावू
लागले व हळू
हळू वेग घेतला
आणि ......... विमान अलगद वर
उचलले गेले , विमान आकाशात झेपावले पृथ्वीचा संपर्क
सुटला त्यावेळी मात्र पोटात खड्डा
पडल्यासारखे झाले खरे पण
ते अगदी थोडा
वेळ . विमान उंच
म्हणजे जवळ जवळ दोन हजार फूट उंच गेले
. खिडकीतून मुंबई मोठी मनोहर
दिसत होती विशेष
म्हणजे झोपडपट्टी अगदी
स्पष्ट दिसत होती
मनाला ते पाहून
वाईटही वाटत होते . " नरेचि केला किती हीन नर " हि केशवसुतांची उक्ती आठवली . आता विमानाने जवळ जवळ ८००० फूट उंची गाठली , खाली काहीच दिसत नव्हते, दिसत होते ते फक्त निळेशार आकाश आणि फक्त पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके . प्रत्येकाला समोर स्क्रीन असतो त्यात तुम्ही सिनेमा , मालिका, व विमानाची सद्यस्थिती पाहू शकता . पण ! मी मात्र एव्हड्या उंचीवर " ज्ञानेश्वरी पारायण " सुरु केले सौ ने विचारले" काय करताय ?" तिला म्हणालो " आयुष्यात परत इतक्या उंचीवर येईल कि नाही सांगता येत नाही म्हणून मुद्दाम येथे आकाशात ज्ञानेश्वरी पारायण करून घेतो व एव्हड्या उंचीवर गेलो तरी माउलीला विसरलो नाही हा हि एक आनंद वेगळाच . विमानाचा स्पीड आता तशी ९०० कि मी होता पण आत काहीही जाणवत नव्हते . हवाई सुंदरी मधेच काही तरी कोल्ड ड्रिंक , देत होत्या व स्न्याक्स वगैरे देऊन दुपारचे गरमागरम जेवण आले आणि " अन्न हे पूर्ण ब्रह्म " जाणून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला.
क्रमशः:

